बीड

जिल्ह्यातील अंगणवाडी पोषण आहार वाटप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

बीड /प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांना पोषण आहार वाटपाहत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणात आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पोषण आहार वाटप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना पोषण आहार निकृष्ट दर्जाचा वाटप होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सादेक इनामदार यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी सीईओंना चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात सीईओ अजित कुंभार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. यामध्ये बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी रामेश्वर मुंडे, लेखाधिकारी जव्हेरी, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेंद्र गर्जे यांचा समावेश आहे. या समितीने चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!