केजक्राईम डायरी

पंकज कुमावत यांच्या पोलीस पथकावर वाळू माफियांचा हल्ला लोडरच्या खोऱ्यानी घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

गौतम बचुटे/केज :-  गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथे गोदावरी नदी पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लोडरच्या खोऱ्यानी जीवे मारण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

बीड जिल्ह्यात अवैद्य वाळू उपसा करणारे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यांना कुणाचा धाक उरला नाही. दि. १६ मार्च बुधवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कारवाही करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या पथकातील पोलीस कर्मचारी बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे व विकास चोपने हे खाजगी वाहनाने केज येथून गेवराईकडे गेले होते. तेथे पोलीस पथक पोहोचतच शहागडकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचे पुर्व बाजुस नदी पात्रात जाऊन पोलीस पथकाने रात्री ८:१० वा. छापा मारला. तेथे एक लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॅक्टर व त्याला वाळू भरण्यासाठी समोर लावलेले खोऱ्याने एलपी ट्रक क्र. (एम एच-२३ /एआ र-८८२२) मध्ये वाळु भरत असतांना दिसले. त्यावेळी तेथे तीन इसम उभे होते. पोलीस गाडीच्या खाली उतरुन ट्रक व ट्रॅक्टर जवळ जात असताना; ट्रॅक्टरचे लोडरचे बाजुला उभे असलेल्या दोन इसमा पैकी अंगात पांढरे कपडे व दाढी असलेल्या इसमाने त्याचे जवळ उभे असलेल्या काळे कपडयातील इसमांनी ट्रॅक्टर लोडर वरील ड्रायव्हरला मोठयाने अवाज देऊन सांगीतले की, समोरुन येणारे लोकांचे अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मार. असे म्हणुन ओरडल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हरने वाळू भरण्यासाठी असलेले लोडरचे खोरे पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने बालाजी दराडे व राजू वंजारे यांच्या अंगावर घालुन दोघांना खाली पाडले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे विकास चोपने, सचिन अहंकारे यांनी त्या दोघांना हाताला धरून बाजुला ओढले. त्यामुळे ते दोघे बचावले. त्या नंतर ट्रॅक्टर लोडर ड्रायव्हरने ट्रॅक्टर लोडर घेवुन नदी पात्राचे बाजुने असेल्या कच्या रस्त्याने काटया कुपाटयाने पळून गेला. तसेच इतर दोन इसम हे नदी पात्राने पळून गेले. त्यावेळी सोबतचे पोलीस यांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते मिळून आले नाहीत. घटनास्थळ वाळुने भरलेला ट्रक क्र. (एम एच-२३/ए आर- ८८२२) हा मिळुन आला. पंचा समक्ष सदर ट्रकचा कलम १०२ सीआरपीसी प्रमाणे सविस्तर जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस पथकांनी आजुबाजुला पळून गेलेल्या इसमांची व ट्रॅक्टर लोडरचे चालकाचे नाव गावा बाबत माहिती घेतली. त्या नंतर पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून तीन जणांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भा.दं.वि. ३०७, ३५३, २३२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज कुमावत यांच्या पथकावर हल्ला म्हणजे पंकज कुमावत यांनाच थेट आवाहन 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे एक निडर अधिकारी असून ते जिल्ह्यात रुजू झाल्या पासून त्यांनी गुटखा, मटका, दारू, बनावट इंधन, चंदन व मटण यावर कारवाया केल्या आहेत गुन्हेगारांचे ते कर्दनकाळ समजले जातात. परंतु गेवराई तालुक्यात अवैद्य वाळू उपशावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या पथकावर जीवे मारण्यासाठी केलेला हल्ला म्हणजे आता थेट पंकज कुमावत यांनाच वाळू माफियांनी आवाहन दिले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!