अंबाजोगाईक्राईम डायरी

भावठाणा येथून पाणबुडी मोटार व सोलार पॅनल चोरी

अंबाजोगाई:  विहीरीवर बसवलेली सोलार पानबुडी मोटर व सोलार पॅनल चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील भावठाणा येथे शनिवारी( दि. १९) उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

भावठाणा येथील शेतकरी सुशांत गोविंद होके ( वय: ३६) यांनी त्यांच्या गट नंबर ७९ मधील शेतामध्ये जिओ कंपनीची ३ एचपीची सोलार पानबुडी व नऊ फ्लेटचे सोलर पॅनल बसवले होते. अज्ञात चोरट्यांनी पानबुडी मोटर, सोलार पॅनल, शंभर फूट वायर व कंट्रोल बॉक्स चोरून नेला. यामुळे त्यांचे ७०   हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुशांत होके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक गुट्टे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!