पाटोदा

पाटोदा येथील तहसील कार्यालय तिसऱ्या मजल्यावर वयस्कर अपंगाची दमछाक

पाटोदा/प्रतिनिधी:
पाटोदा तहसील कार्यालय हे सध्या तिसऱ्या मजल्यावर असल्याने अपंग व वयस्कर माणसांना तहसील मधील काम करीता मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. लिफ्टची सुविधा अद्यापपावेतो कार्यान्वित केली नाही लिफ्टची सुविधा चालू करा किंवा तहसील कार्यालय हे दुसरा किंवा पहिल्या मजल्यावर आणावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे पाटोदा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मार्फत करण्यात आली आहे.

यासंदर्भात पाटोदा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती ने दिनांक तीन मार्च रोजी तहसील कार्यालय व तसेच उपविभागीय कार्यालय पाटोदा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटोदा येथे नवीन तीन मजली भव्य इमारत बांधण्यात आली. सदर नवीन इमारतीमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून तहसील कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. सोबतच या इमारती मध्ये उपविभागीय कार्यालय चालू करण्यात आले होते यामुळे तहसील कार्यालय हे तिसऱ्या मजल्यावर नेण्यात आले तिसऱ्या मजल्यावर कार्यालय असल्यामुळे तहसील कार्यालयात अपंग वयस्कर व्यक्तींना आपले शेती संदर्भाचे तसेच इतर काम करता तहसीलदाराशी संपर्क साधने करीता मोठ्या प्रमाणात दमछाक व त्रास सहन करावा लागत आहे. वयस्कर व्यक्तींना व अपंगांना इतरांचा आधार घेतल्याशिवाय तहसीलदारांशी संपर्क साधता येत नाही विशेष म्हणजे तहसील कार्यालयाचे काम तीन चार वर्षापूर्वी होऊन सुद्धा अध्यापक पावेतो या ठिकाणी लिफ्टचे काम पूर्णत्वास गेले नाही.
उपविभागीय कार्यालय जुन्या तहसीलच्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे तहसील कार्यालय हे दुसऱ्या मजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर आणण्याची मागणी आहे
यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लिफ्टचे काम पूर्णत्वास न्यावे किंवा तहसील कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आणावे जेणे करून अपंग व वयस्कर व्यक्तीची सुविधा होईल. यासंदर्भाचे निवेदन पाटोदा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मार्फत देण्यात उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष अब्दुलकादर मकरानी उपाध्यक्ष बाळासाहेब घुमरे तसेच सचिव सय्यद कदीर यांच्या सह्या आहेत. वरील संदर्भात मागणी मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी स्वीकारली आहे.
तहसील कार्यालयाची इमारत तयार होऊन जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला मात्र अद्याप लिफ्टचे काम अपुरे ठेवण्यात आले आहे लिफ्टचे काम अपूर्ण असताना लिफ्टचे काम अपूर्ण असताना तहसील कार्यालय ची इमारत ताब्यातच का घेतली तिसऱ्या मजल्यावर तहसील कार्यालय कार्यान्वित केल्या मुळे अपंग व वयस्कर यांचा विचार करता लिफ्टचे काम त्वरित करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असताना अद्याप पावेतो का पाठपुरावा केला जात नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!