अंबाजोगाई

विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना पूर्वीच्या बँक खात्यावर तात्काळ अनुदान द्यावे-राजकिशोर मोदी

बीड जिल्हा काँग्रेसचे मुख्यमंञ्यांना निवेदन

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन,इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन,राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन यासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या योजनांचे लाभार्थी मागील अनेक महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत तरी सदर लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या बँक खात्यात अनुदान देण्याबाबत किंवा तसे शक्य नसल्यास तहसील कार्यालयामार्फत रोख स्वरुपात अनुदानाच्या रक्कमा वितरीत करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती व मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांना बुधवारी (दिनांक ९) उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना घेऊन पापा मोदी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले यावेळेस त्यांनी सदरील विषयावर सकारात्मक चर्चा केली.

बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील एक वर्षापासून आपण कोरोना या महामारीशी लढा देत आहोत.यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार,बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे व सर्व जिल्हा प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करीत आहोत.परंतु प्रशासनाने आम्ही केलेल्या पुढील सुचनांचा संवेदनशीलपणे विचार करावा.वरिल विषयी सदर सुचना अशा संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन,इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन यासह शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनेतील विद्यमान लाभार्थींचे अनुदान मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.जिल्हाधिकारी बीड यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणार्‍या लाभाार्थ्यांना अनुदान देण्याबाबत आदेशित केले होते.त्यामुळे खाजगी बँकांमध्ये,जिल्हा बँकेत खाते असणार्‍या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही.कारण,राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे हे लाभार्थ्यांना शक्य होत नाही.एक तर राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी कर्मचारी वर्ग हा तुटपुंजा आहे सर्व योजना राष्ट्रीयकृत बँकेत लागू असल्याने तेथे दररोज प्रचंड गर्दी असते.सदरील नमुद योजनांचे लाभार्थी हे वयोवृद्ध,दिव्यांग आहेत.राष्ट्रीयकृत बँकेत असणारी प्रचंड गर्दी,खाते उघडण्याची किचकट प्रक्रिया त्यासाठी लागणारे वारेमाप शुल्क आणि सदर बँकेच्या अधिकारी कर्मचार्‍याकडून मिळणारी अपमानजनक वागणूक तसेच मागील दिड वर्षापासून कोरोना पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या बँका,फिजिकल डिस्टन्स,जमावबंदी आदेश,वाहतूक व्यवस्था बंद,आणि त्यात सदर लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना कोरोना कालावधीत आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.राष्ट्रीयकृत बँका विविध शासकीय योाजनेतील लाभार्थींचे बँक खाती आपल्या बँकेत सुरू करण्यास किंवा उघडून देण्यास अनुकुल दिसत नाही.त्यामुळे सन्माननीय महोदय याप्रश्‍नी सदर लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्याच बँक खात्यात अनुदान रक्कम तात्काळ देण्याबाबत आदेशित करावेत तसेच प्रशासनाला हे शक्य होत नसेल तर प्रत्येक तहसील कार्यालयातून सदर योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान नगदी रोख स्वरूपात देण्यात यावे.डिसेंबर २०२१ पर्यंत किमान अशा स्वरूपातच अनुदान वितरित केल्यास यामुळे निराधार,वृद्ध,दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना लॉकडाऊन मध्ये फायदा होईल असे वाटते अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनाची प्रतिलिपी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांना पाठवण्यात आली आहे.सदरील निवेदनावर निवेदक जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,सचिन जाधव,महेश वेदपाठक,अमोल मिसाळ यांच्यासह गोरोबा सरवदे,इदरसुल हक जहुल हक,इंदुबाई वाघमारे,जुलेखा शेख रशीद,दत्तू गायकवाड,ग्यानबा धबडगे,विजयमाला गायकवाड,सटवा खलसे,गयाबाई धुमाळ,कौशल्या खलसे आदी विविध योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!