
अंबाजोगाई: बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास मनाई असताना अंबाजोगाई शहरातील पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल दिले जाते. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन जाऊन त्याचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. यामुळे बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास शासनाने मनाई केलेली आहे. असे असताना अंबाजोगाई शहरात खुलेआम पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल दिले जाते. बॉटलमध्ये पेट्रोल दिले जात असल्याने पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या वाहनांना ताटकळत थांबावे लागते. बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास मनाई असताना अंबाजोगाई तहसीलदारांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हे त्वरित थांबवावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.