केज
केज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग रुजू

गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून वैभव सारंग रुजू झाले आहेत.
केज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून वैभव सारंग यांची बदली झाली आहे. धारूर पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रभारी अधिकारी पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा परिविक्षाधीन कार्यकाळ संपन्न पार पडला आहे. पोलीस उपनरीक्षक वैभव सारंग यांचा धारूर येथील परिविक्षाधीन कार्यकाळ संपताच त्यांना केज येथे नियुक्ती मिळाली आहे. पोलीस उपनरीक्षक वैभव सारंग केज पोलीस ठाण्यात रुजू होताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनरीक्षक राजेश पाटील आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुषपगुच्छ देवून स्वागत केले.