कृषीक्राईम डायरी

पोलीस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दारुड्या विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज: केज पोलीस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध कठोर पावले उचलून पोलीसांनी त्या दारुड्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबची माहिती अशी की, दि. २० फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात कोठी ता. केज येथील शेषेराव तुकाराम नवले, वय ४८ वर्ष याने मोठ मोठ्याने आरडा-ओरड करून गोंधळ घातला. त्या वेळी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीसांनी त्याच्या तोंडाचा वास घेतला असता आंबट व उग्र स्वरूपाचा वास आला. म्हणून त्याला उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून सदर शेषेराव तुकाराम नवले याने अमली पदार्थाचे सेवन केला असल्याचा अहवाल दिला. त्या नंतर पोलीस अमंलदार जसवंत शेप यांच्या फिर्यादी वरून शेषेराव तुकाराम नवले याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अमली पदार्थाचे सेवन करून गोंधळ घातल्या प्रकरणी गु.र.नं. ४५/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ४५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार जोगदंड हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!