अंबाजोगाई

देवळा येथे राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेस सुरुवात

शिवाजी जाचक/ममदापुर:  येथून जवळच असलेल्या देवळा येथे बालकांना पोलिओची लस मिळण्यासाठी लसीकरण केद्राची सुरुवात रविवारी दि. 27 रोजी करण्यात आली.

गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील लसीकरण केंद्राचे उद्धघाटन गावच्या सरपंच वच्छलाबाई यादव यांच्या हस्ते तर अंगणवाडी युनिट दोन लसीकरण केंद्राचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य पार्वतीबाई जाधव यांचे हस्ते झाले. यावेळी आरोग्य सेविका सरिता शिंदे, अंगणवाडी कार्यकर्ते, आशाताई घनगाव, मनीषा पांचाळ, अनिता पिसाळ, मनीषा पवार, सविता वाघमारे, आशावर्कर, जयश्री गायकवाड, मीराबाई साळुंके, आरोग्यदूत बाबासाहेब यशवंत, बजरंग यशवंत, गणेश जाधव , देवळा श्रमकरी ग्रुपचे सदस्य रवींद्र देवरवाडे, विनोद शेळके उपस्थित होते. या दोन केंद्रात गावातील तसेच ऊसतोड कामगार यांच्या ही झिरो ते पाच वर्षातील मुलांना पोलिओ डोस देण्यात येत आहेत. देवळा गाव हे नेहमी राष्ट्रीय उपक्रमात सहभागी असते, भारत पोलिओमुक्त आहे, परंतु काही देशांमध्ये पोलिओ अद्याप असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो, आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षित तेचि खात्री घ्या, पोलिओ चा डोस प्रत्येक वेळी घ्या, पोलिओ वर मात करण्यासाठी देशासाठी देशाला मदत करा, असे अहवान आरोग्य विभागाच्या  व देवळा श्रमकरी ग्रुपचे सदस्य रवींद्र देवरवाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!