क्राईम डायरीबीड

लाचखोर पुरवठा निरीक्षकाला एक दिवसाची कोठडी

बीड/प्रतिनिधी

बीड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील लाचखोर पुरवठा निरीक्षक रवींद्र ठागणेला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. १० हजारांची लाच घेताना मंगळवारी एसीबीने ठाणगेला रंगेहाथ पकडले होते.

बीड तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या पुरवठा निरीक्षक ठाणगेविरोधात ढिगभर तक्रारी हाेत्या. प्रचंड लाचखोरी करूनही एसीबीकडे त्याची आतापर्यंत तक्रार झालेली नव्हती. दरम्यान, एका स्वस्त धान्य दुकानाला नियमाप्रमाणे मंजूर मालपुरवठा करण्यासाठी ठाणगेने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी स्वस्त धान्य दुकानदाराकडे केली होती. या दुकानदाराने एसीबीकडे ठाणगेची तक्रार केली. लाच पडताळणीनंतर एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने मंगळवारी १० हजारांची लाच स्वीकारताना ठाणगेला रंगेहाथ जेरबंद केले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावल्याची माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!