आष्टीक्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी

आष्टी /प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर नात्यातील २५ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि.५) घडली. याप्रकरणीअंभोरा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

तालुक्यातील एका गावात माहेरी आलेल्या महिलेची ७ वर्षीय मुलगी बाहेर खेळत होती. दरम्यान, नात्यातील एका २५ वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. मुलीने घरी आल्यावर हा प्रकार आईला सांगितला. त्यावरून पीडितेच्या आईने अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अंभोरा पोलिसांनी आरोपीस अटक करून रविवारी (दि.६) न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!