क्राईम डायरीबीड

पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खून

बीड/ प्रतिनिधी:

बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा (Police Patil ) डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.24) रात्री 10 च्या सुमारास घडली. भिमराव ससाणे (वय 50 रा.मानखुरवाडी ता. बीड ह.म.ढेकणमोहा) असे मयताचे नाव असून ते पाेलीस पाटील आहेत.

ढेकणमोहा फाट्यावर त्यांच्या डोक्यात खोऱ्याने वार करत त्यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि.मुस्ताफा शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!