अंबाजोगाई

पंकज कुमावत यांच्या पथकाची येवता येथे टपरीवर धाड : २५ हजाराचा गुटखा जप्त

टपरी मालक आणि माल विकणारा कळंब येथील व्यापाऱ्यावरही गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केज तालुक्यातील येवता येथे पान टपरीवर धाड टाकून २५ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला. या प्रकरणी टपरी चालक आणि त्याला गुटखा विक्री करणारा कळंब येथील व्यापाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील येवता येथे सावता पान सेंटर येथे दि. १६ मार्च बुधवार रोजी दुपारी २:०० वा. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई केली. तेथे संतोष वासुदेव राऊत यांच्या सावता पान सेंटर मध्ये बंदी असलेले तंबाखू व गुटखा विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने टपरीची झडती घेतली असता गोवा कंपनीचे गुटख्याचे ४७ पुडे, बाबा पानमसाला कंपनीचे २२ पुडे, बाबा कंपनी सुगंधी तंबाखु २३ पुडे, विमल कंपनीचे गुटख्याचे १६ पुडे, विमल कंपनीचे गुटखीचे सुगंधी तंबाखुचे १६ पुडे, गुलाबी रंगाचे विमल कंपनीचे गुटख्याचे ६ पुडे असा एकूण २५ हजार ३०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला. टपरी चालक संतोष वासुदेव राउत रा. येवता ता. केज याला ताब्यात घेऊन पोलीस पथकाने चौकशी केली असता त्याने हा माल कळंब येथील बालाजी आडणे यांच्या बालाजी पान मटेरीयल नावाच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले.  त्या वरून पंकज कुमावत यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादी वरून दि. १६ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात सावता पान सेंटरचे संतोष वासुदेव राऊत रा. येवता, बालाजी पान मटेरीयल कळंबचे बालाजी आडणे यांच्या विरुद्ध गु.र.नं. ८०/२०२२ भा.दं.वि. ३२८, २७३, २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!