
सिरसाळा/प्रतिनिधि: परळी तालुक्यातील रामेवाडी ( कासरवाडी) येथील गजानन साबळे याने मतदार जनजागृतीसाठी लिहिलेलं गीत आणि प्रसिद्ध युवा गायक राहुल खरे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत राज्य निवडणुक मुख्य आधिकरी श्रीकांत देशपांडे यांनी स्विाकारले आहे. हे गीत मतदार दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सादर करण्यास सांगितले. आणि हे गीत मतदान जनजागृती साठी वापरण्यात येईल असे मुख्य निवडणुक आधिकारी सांगीतले. गजानन साबळे हा एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद येथे वृत्तपत्रविद्या व जनसंवाद या महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे.
उत्कृष्ठ लिहीलेल्या या गीताबद्दल मतदार दिना दिवशी गजानन साबळे याचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यपिठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या डॉ. दीपक पवार आदी उपस्थित होते. या त्याच्या यशासाठी सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गजानन साबळे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे.
सिरसाळा पत्रकार संघ करणार भव्य सन्मान
परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात कासारवाडी/रामेवाडी एक छोटेसे गाव आहे. याच ठिकाणी लहानाचा मोठा झालेला गजानन कवि ,शाहीर म्हणून ओळखला जातो. शेतकरी, मजुर, कष्टकरी, वंचित, पिडित यांच्या वेदना गजानन ने आपल्या लिखानातून शब्द बद्ध केल्या व समाजा समोर मांडल्या आणि आता मताधिकिर जागृती कार्यक्रम राबविण्यासाठी राज्य भर वापरले जाणार आहे.म्हणून सिरसाळा पत्रकार संघ गजानन चा सत्कार व सन्मान करणार आहे.