राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत प्रतिक हनुमंत मुंडे याचे यश

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
कोविड काळात प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत अशाही परीस्थितीमध्ये खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा ग्रामीण भागात राहणारा प्रतिक मुंडे यांने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश संपादन केले.
या यशाबद्दल प्रतिक मुंडे याचा सत्कार स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. किशोर गिरवलकर यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक निवृत्ती दराडे, पर्यवेक्षक अरुण पत्की, शैलेंद्र कंगळे व मार्गदर्शक, मोरेश्वर देशपांडे उपस्थित होते . यशाबद्ल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. सुरेंद्रजी आलुरकर, भा. शि. प्र. संस्थेचे कार्यवाह मा. नितीनजी शेटे , स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह बिपीन क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्षा शरयू हेबाळकर, मुख्याध्यापक निवृत्ती दराडे , उपमुअ. यशवंत चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेस शुभेच्छा दिल्या.