लेख

माझ्या जीवनाचा प्रवास – सिद्धेश्वर स्वामी

भाग.४

वकील संघात वकिलांनी पाठविलेल्या नोटिसच्या रजिस्टर्ड पोस्टाच्या परत आलेल्या अनेक पावत्या वकील संघातून गायब होत असल्याबाबत सदस्य नेहमी तक्रार करत होते, त्याबाबत वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सावरे साहेब यांनी सूचना व संशय व्यक्त केल्याप्रमाणे मी लक्ष ठेवले असता वकील संघाचे एक सर्वात जेष्ठ सदस्य …….हे सर्व परत पावत्या ह्या वकील संघातील कपाटाखाली ज्यांच्या आहेत त्यांना सापडू/भेट नये म्हणून टाकत असल्याचे मी स्वतः त्यांना पाहिले व सूचना केली की असे करू नका नाहीतर मी सर्व साधारण सभेत ही घटना प्रत्येक सदस्यांना सांगेन. तेव्हा पासून सदर पावत्या गायब होणे बंद झाले होते.तसेच त्यांना आणखी वाईट सवय होती ती चालुच आहे, ती म्हणजे एक दोन पानांचे सायटेशन असेल तर कुणाच्याही किंवा वकील संघातील पुस्तकाचे पान फाडून घेणे, हे मला दरगड वकील साहेब यांचेकडे काम करत असताना माहीत होते, तसेच वकील संघातील एका पुस्तकाचे फाडलेले तेच पान मागत असत.
वकील संघात काम करत असताना तत्कालीन सरकारी वकील व वकील संघाचे सदस्य असलेले एक सदस्य यांचे विरुद्ध वकील संघाच्या काही सदस्यांनी तक्रारी अर्ज दिला व त्या अर्जावर सर्व साधारण बैठक होऊन त्या वकील साहेबांचे सदस्यसत्व सर्वानुमते रद्द केले होते, त्या बैठकी दिवशी मी मुंबई येथे होतो त्यामुळे बैठकीचा इतिवृत्त मला माहित नव्हता, मी मुंबईहून परत आल्यानंतर मला ते समजले ते ही बार कौन्सिल कडे सदर ठराव तात्काळ पाठवू नये असे ……यांनी म्हणल्यामुळे मला समजले.
दरवर्षी जसे नवीन सदस्य वकील संघाकडे सदस्य होण्यासाठी अर्ज करतात त्याप्रमाणे निवडणूक होण्याच्या वेळेस जानेवारी १९९९ मध्ये अनेकांनी नवीन सदस्य म्हणून वकील संघाकडे अर्ज दिले, त्यामध्ये एक सदस्य यापूर्वी १९९५ साला अगोदर सुद्धा सदस्य होते ती माहिती लपवून नवीन सदस्य म्हणून सदस्य होण्यासाठी अर्ज केला होता. लगेचच सन २००० मध्ये त्यापैकी एका सदस्याने वकील संघाकडे सदस्य होण्यापूर्वी पासून मी अंबाजोगाई येथे वकिली व्यवसाय करत असल्याचे प्रमाणपत्र मागितले त्यावर कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असे ठरले त्यानुसार कार्यकारिणीच्या काही सदस्यांनी प्रमाणपत्र द्यावे, देऊ नये किंवा शपथपत्र घेऊन द्यावे असे आपले मत (असे माझ्या मते चुकीचे मत)सदर अर्जावर लिहिले, तरी सुद्धा सदर सदस्यास चुकीचे व खोटे वकिली व्यवसायचे प्रमाणपत्र दिले, वास्तविक मी १९९० पासून कोर्टात व १९९५ पासून वकील संघात काम करत असल्याने १९९९ पूर्वी त्या सदस्यास कधीही अंबाजोगाई येथे कधीही वकिली करताना पाहिले नव्हते,त्याच्या चौकशीचा वृत्तांत पुढील भागात वाचावयास मिळेल.
वडिलांनी कोर्टातील सर्व केसेस मागे घेतल्यानंतर सन २००० साली माझे वडील हे मयत झाले. ते वर्ष वकील संघात काम करत असताना मला फार कठीण गेले.
सन २००१ साली नवीन अध्यक्ष झाले, उपविभागीय पोलीस अधिकारी शहाजी उमाप साहेब यांच्या काळात माझ्या एका चुकीच्या कायद्याने चूक नसलेल्या गोष्टीमुळे तेव्हा फक्त काही तास पोलीस स्टेशनमध्ये बसावे लागले होते.
सन २००२ साली जिल्हा न्यायालयातील वकील संघाचा हॉल मा. न्यायालयाने न्यायाधीश यांची संख्या वाढल्या मुळे ताब्यात घेऊन वकील संघासाठी छोटा हॉल पूर्वेकडे दिला. त्यावेळी त्या वकील संघाच्या हॉल मध्ये वकील संघाच्या सदस्यांनी स्वतः टाकलेली टेबलची स्वच्छता न करता वकील संघाच्या टेबल व्यतिरिक्त इतर टेबलची मी स्वच्छत: करत नव्हतो म्हणून माझे प्रामाणिक पणावर शंका घेऊन माझे जागी दुसरे दोन नोकर ठेवा म्हणून काही त्यावेळच्या काही ज्युनिअर वकील साहेबांनी वकील संघाकडे अर्ज दिला होता, अर्ज देणाऱ्या एक वकील साहेबांनी मला स्वतः त्यावेळी सांगितले की, हा अर्ज मला द्यायचा नव्हता परंतु त्यांचे नसलेले सिनीयर…….. यांनी द्यायला सांगितला आहे, ते सिनीयर प्रामाणिक आहेत हे तर मला यापूर्वीच समजले होते? पण त्या अर्जावर चर्चा होऊन तक्रारीत काहीही निष्पन्न न झाल्याने मला समज दिली व तेव्हापासून मी आजतागायत वकील संघात लिपिक म्हणून काम पाहत आहे.
विविध पदासाठी अर्ज करण्यासाठी परत काही सदस्यांनी प्रमाणपत्रे मागितली त्यावेळी पुर्वी चुकीचे प्रमाणपत्र घेतलेल्या सदस्यांनी परत सदस्य होण्यापूर्वीची मागील वर्गणी भरून नवीन प्रमाणपत्र घेतले जे चुकीचेच होते.
दि.०३/०८/२००३ रोजी मी राहत असलेल्या ठिकाणच्या जवळील इमारती वरून सकाळी ८-०० वाजता पडलो, त्यामुळे माझा पाय मोडला, त्यामुळे मी जवळपास एक महिना वकील संघात येऊ शकलो नाही, त्यावेळी सर्वांनी येऊन भेटून आधार देण्याची आवश्यकता असते, परन्तु फक्त अध्यक्ष ॲड. कै.के.बी.मुंडे साहेब व मी ज्यांच्या कडे राहत होतो ते माझे आधारस्तंभ ॲड. कै.अण्णासाहेब लोमटे (काका)साहेब यांनी भेट दिली व पुढील सर्व मदत कै.अण्णासाहेब लोमटे (काका)साहेब, कै.डॉ. विजय बुरांडे सर व डॉ.नंदकिशोर सोमवंशी सर यांनी केली.   (क्रमशः…)

लेखन: सिद्धेश्वर स्वामी (लिपीक, वकी संघ अंबाजोगाई)

संपादन: प्रदीप तरकसे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!