आ.सुरेश धस यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला उपस्थित रहा

पाटोदा/ प्रतिनिधी:
लोकनेते बहुजन नायक आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वा खाली सोमवारी ( दि. २८) रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला असुन या मोर्चाला पाटोदा तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहान आ. सुरेश आण्णा धस यांचे कटृर समर्थक सय्यद शफुभाई शेट यांनी केले आहे.
आ. सुरेश धस यांनी जाहिर केले की बीड येथे मराठा क्रांती मोर्चा होणार आहे.आज एक लोकप्रतिनिधी समाजासाठी पुढे येत आहे आता आपलीही जबाबदारी आहे की जेव्हा लोकप्रतिनिधी समाजाला आवाहन करतात,की मोर्चाला या म्हणून तेव्हा आपली जबाबदारी आहे की आपणही पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी व्हायला पाहीजे म्हणून मराठा आरक्षणासाठी,ऊस तोड मजुरांच्या मागण्यासाठी,शेतकरी पिक कर्ज,पिक विमा व ईतर मागण्यासाठी सोमवार दिनांक २८/६/२०२१ रोजी सकाळी ठीक १०-३० वाजता आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड वर मोर्चा आयोजित केला असुन या मोर्चात सर्व मुस्लिम बांधवांनी व सर्व जाती धर्माच्या बांधवांनी व तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाह सय्यद शफुभाई शेट यांनी केले आहे.