अंबाजोगाई

जनतेच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक समन्वयातून करणार- राजेश्वर चव्हाण यांचे प्रतिपादन

अंबाजोगाईत तालुका समन्वय समितीची बैठक

अंबाजोगाई / प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी समन्वय समिती कटिबद्ध आहे.पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार शासन-प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्या समन्वयातून समस्यांची उकल करून शासकीय योजना,मदतीपासून गोरगरीब,वंचित नागरिकांना न्याय देण्याच्या विधायक भूमिकेतून समन्वय व पुनर्विलोकन समिती काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश्वर बाळासाहेब चव्हाण यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत केले.तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी पदभार घेतला.अंबाजोगाईत तालुका समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

शहरातील तहसिल कार्यालयात अंबाजोगाईत तालुका समन्वय समितीची बैठक संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश्वर बाळासाहेब चव्हाण हे होते.तर बैठकीस सदस्य आमदार संजयभाऊ दौंड,माजी आ.पृथ्विराज साठे,सदस्य सचिव तहसिलदार विपीन पाटील,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्यप्रशासक गोविंदराव देशमुख, समितीचे सदस्य अर्जुनराव वाघमारे, औदुंबर मोरे,सखाराम टेकाळे,शिलाबाई शिवाजीराव सोमवंशी, सविताताई विठ्ठलराव कोकरे तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर माले, पी. सी. पाटील, बाळासाहेब देशमुख, दत्ताञय यादव, रविकिरण देशमुख, अविनाश साठे, गुणवंतराव आगळे, सुधाकर जोगदंड यांचेसह या बैठकीस अंबाजोगाईचे नायब तहसिलदार (महसूल-२),तहसील कार्यालयातील पदधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,तालुका कृषी अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, उ.वि.अ.म.जि.प्रा.उपविभाग,विभागीय अभियंता सा.बां.विभाग,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,अभियंता ल.पा.उपविभाग जि.प.(बां) उपविभाग,उपविभागीय पाटबंधारे उपविभाग तसेच अंबाजोगाई तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे सर्व कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती. या बैठकीत तालुका समन्वय समिती मार्फत तालुक्यातील विविध कार्यालयामार्फत नागरिकास देण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला व त्यांच्या मार्फत राबविण्यात येणा-या योजना बाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.यात पंचायत समिती,तालुका आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,गटशिक्षणाधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्प ग्रामीण आणि शहर, कृषि विभाग, नगरपरिषद,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,लघु पाटबंधारे उपविभाग,जि.प.(बां) उपविभाग,पाटबंधारे उपविभाग यांच्या माध्यमातून तालुक्यात राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांचा बैठकीतील चर्चेत समावेश होता.समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर तालुका समन्वय समितीची बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!