कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळाला शिलाईमशीनचा आधार

अंबाजोगाई: तालुक्यातील राडी येथील श्रीमती ज्योती विलास गंगणे यांचे पती यांचे कॉव्हिडंच्या दुसऱ्या लाटे दरम्यान निधन झाले, तसेच सौ गीता गगंणे व धर्मराज गगंणे हे दिव्यांग दाम्पत्य खूप परिश्रम करून मुलांसह जिवन जगत आहेत.या कुटुंबाना उदरनिर्वाह भागवणे व मुलाचें शिक्षण पूर्ण करण्यासाठीचा प्रश्न होता.
या दोन्ही कुटुंबाची भेट आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार व सकाळचे प्रतिनिधी प्रशांत बर्रदापुरकर यांनी भेट घेऊन दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली असता ज्योती व गीताताई यांना या दोघिना शिलाई काम येते परंतु शिलाई मशीन घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याची खंत त्यांनी वेक्त केली.
ऍड संतोष पवार यांनी ही बाब डॉ पोतदार यांच्या आई केशरबाई यांना सांगितली असता त्यांनी तात्काळ एक शीलाई मशीन देण्याचे मान्य केले,तर दिव्यांग गीताताई यांना पिकोफॉल मशीन घेण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष विवेक गंगणे व आरुण काळे यांनी सहकार्य केले. या दोन्ही कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी आधार माणुसकीचा उपक्रमाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली. शनिवारी ज्योति व गीताताई गगंणे यांना पिकोफॉल व शीलाई मशीन देण्यात आली या प्रसंगी उपस्थित श्रीमती केशर राजाराम पोतदार, राजाराम पोतदार,ईनरव्हील क्लबच्या अध्यक्ष। अंजली चरखा,डॉ सचिन पोतदार, प्रा कऱ्हाड , ऍड संतोष पवार, प्रशांत बर्रदापुरकर,अरुण काळे,ऍड सोनवणे उपस्थित होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी ज्योती व गीता ताई यांना शिलाई मशीन उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता.
समाजातील आर्थिक संपन्न लोकांनी वंचित कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहन आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी केले.