केजक्राईम डायरी

चायनिज सेंटरवर राडा; दोघा विरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- चायनीज सेंटरवर येऊन दोघांनी पैसे मागितले. पैसे न दिल्याने चायनीज सेंटर चालकाला दोघांनी लोखंडी रॉड आणि काठीने गंभीर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, फारुख बशीरोद्दीन इनामदार रा. केजीएन नगर, कळंब रोड केज यांचे बीड रोड लगत फेमस चायनीज हॉटेल आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या दरम्यान फारुख बशीरोद्दीन इनामदार याला शेख अमीरोद्दीन उर्फ अम्मु याने हॉटेलवर येवून पैशाची मागणी केली. फारुख बशीरोद्दीन इनामदार कशाचे पैसे? म्हणुन विचारताच त्याला शिवीगाळ करुन जिवे मारून टाकीन असे म्हणुन शेख अमीरोद्दीन उर्फ अम्मु याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने डाव्या पायाचे नडगीवर मारुन गंभीर जखमी केले. तसेच त्याचा साथीदार शेख तखियोद्दीन बशीरसाब याने हातातील काठिने डावे भुवईवर मारुन जखमी केले. या प्रकरणी दवाखान्यातून प्राप्त झालेल्या एमएलसी वरून केज पोलीस ठाण्यात दि. ९ मार्च रोजी फारुख बशीरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादी वरून शेख अमीरोद्दीन उर्फ अम्मु आणि शेख तखियोद्दीन बशीरसाब यांच्या विरुद्ध गु.र.नं. ६६/२०२२ भा.दं.वि. ३२६, ३२४, ४२७, ५०६, ५०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!