बीड

श्रीगणेश वाचनालयात शिवजयंती साजरी

पिंपळनेर / प्रतिनिधी:
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीगणेश सार्वजनिक वाचनालयात संकल्प सेवाभावी संस्था, राजमाता सेवाभावी संस्था व वाचनालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राजेश गवळी तर प्रमुख पाहूणे म्हणून कपील नरवडे, भागवत कदम, भागवत ठोकरे, गोकूळ गवळी सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आकाश भुजबळ, मच्छिंद्र साठे, आदीनाथ गवळी, सखाराम बिटे, माऊली आनेराव, मच्छिंद्र तिरगुळ, अण्णा ठोकरे, रवी पवार, परमेश्वर ठोकरे, संजय शिंदे, विकास वाणी, बाबु जाधव, माऊली जाधव सह आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!