अंबाजोगाई
सहा. गटविकास अधिकारी विवेकानंद कराड सेवानिवृत्त

अंबाजोगाई: येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विवेकानंद कराड नियत वयोमानानुसार सोमवारी ( दि. २८) सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३० वर्ष आपली सेवा बजावली.
विवेकानंद कराड हे वांगदरी ता. रेणापूर जि. लातूर येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी आष्टी, केज धारूर व अंबाजोगाई या ठिकाणच्या पंचायत समितीमध्ये सेवा केली. अंबाजोगाई येथे सहाय्यक गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोनशीकर यांच्यासह कर्मचार्यांनी त्यांचा सपत्नीक सेवा गौरव करून निरोप दिला.