महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचेशैक्षणिक शुल्क माफ करावे

माजलगाव येथे अभाविपची मागणी मागील दीड वर्षापासून
माजलगाव /प्रतिनिधी
शाळा-महाविद्यालयांत कोविडच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे प्रत्यक्ष अध्यापन केले जात नाही. याचसोबत लॉकडाऊनमुळे पालकांचे उत्पन्नही घटलेले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे गत शैक्षणिक सत्र व या सत्रातील शिक्षण शुल्क माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली.
अभाविपच्या वतीने प्राचार्यांच्या माध्यमातून शिक्षण विभागास सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, गत शैक्षणिक सत्रात विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्यामुळे महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच शालेय स्तरावरील दहावी-बारावीच्या परीक्षा न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक शुल्क परत करावे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तत्काळ वाटप करण्यात यावे यासह इतर मागण्याही या निवेदनात समाविष्ट होत्या. हे निवेदन देताना अभाविपचे शहराध्यक्ष प्रा.डाॅ. कमलकिशोर लड्डा, प्रदेश सदस्य सोमेश दहिवाळ, शहर मंत्री प्रतीक जोशी, भाजप सरचिटणीस बाबासाहेब आगे, अमर महाजन, दिग्विजय रांजवन, अथर्व पोहनेरकर, अभिषेक जगताप, शहर विद्यार्थिनीप्रमुख आयुषी बोरा हे उपस्थित होते.