एमआरजीएस ची तक्रार केल्यामुळे एकास बेदम मारहाण; उमराई येथील घटना
११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई: गावातील एमआरईजीएस कामाची तक्रार का केली व मनासारखा का वागत नाही अशी भांडणाची कुरापत काढून एकास बेदम मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील उमराई येथे घडली. या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उमराई येथील बालासाहेब शिवाजी केंद्रे यांनी गावातील एमआरजीएस च्या कामात होत असलेल्या अनियमिते बाबत पंचायत समितीमध्ये तक्रार केली होती. यामुळे घोटाळा करणाऱ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा राग मनात धरून आरोपींनी बाळासाहेब केंद्रे यांना उमराई फाट्यावर गाठून ऊस, लाकूड, दांडा व गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बालासाहेब शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरून नितीन जनार्दन केंद्रे, श्रीराम महादेव केंद्रे, पांडुरंग श्रीराम केंद्रे, केशव श्रीराम केंद्रे, विठ्ठल फुंदे, अनिकेत विठ्ठल फुंदे, अभिषेक विठ्ठल फुंदे, रामा भीमराव केंद्रे, श्रीनिवास रामराव केंद्रे, जनार्दन महादेव केंद्रे व महेश श्रीराम केंद्रे यांच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडे करीत आहेत.