अंबाजोगाईक्राईम डायरी

रिक्षाचे जास्त भाडे सांगितल्याने मारहाण; शहर ठाण्यात गुन्हा नोंद

अंबाजोगाई: शहरातील बस स्टँड ऑटो पॉईंट येथे रिक्षाचे जास्त भाडे सांगितल्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी रिक्षा चालकाच्या फिर्यादी वरून ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाआहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार; अंबाजोगाई शहरातील बस स्टँड ऑटो पॉईंट येथे सय्यद आजाद सय्यद अहेमद (वय: ४८) रा. जिरेगल्ली हे रिक्षा चालवतात. यावेळी सलीम इसमा शेख (रा. मंगळवार पेठ) याने रिक्षाचे भाडे विचारले असता सय्यद यांनी 15 रुपये सांगितले तेव्हा सलीम याने जास्त भाडे का सांगितले असं म्हणून शिवीगाळ करत दगड हातात घेऊन डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी सय्यद आजाद सय्यद अहेमद यांच्या फिर्यादी वरून सलीम इससाम शेख याच्यावर कलम 324, 504 भादवी नुसार अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक कांदे करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!