माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा- राहूल खोडसे

केज/प्रतिनिधी:
केज तालुक्यातील माळेगाव ते लोखंडी सावरगाव हा राज्यमार्ग तात्काळ दुरुस्ती करून घ्यावा असे मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने केज तहसीलदार यांना दिले
सविस्तर वृत्त असे की माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना दळणवळनासाठी तसेच संबंधित रस्त्यालगत असलेल्या तालुक्यातील तसेच अंबाजोगाई तालुक्यातील बऱ्याच गावांना हा मुख्य रस्ता असून यावर सिरीयस तसेच डिलिव्हरी पेशन्ट यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत असून या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण देखिल अधिक झाले आहे त्यामुळे संबंधित रस्त्याची मागणी होत आहे यामुळे आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ, तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, वि. आघाडी अध्यक्ष संदीप शितोळे, तालुका संघटक अमर धपाटे,सुरज चौधरी, दादा चव्हाण, अमर शेख आदी