पुलावर उसाचे ट्रॅक्टर अडकल्याने लोखंडीसावरगाव येथे एक तास वाहतूक ठप्प

अंबाजोगाई: तालुक्यातील लोखंडीसावरगाव येथील तलावाच्या समोर असलेल्या पुलावर उसाचे ट्रॅक्टर व दुसरे वाहन अडकल्याने एक एक तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
पाण्याची टाकी ते केज हा राज्य महामार्ग बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. लोखंडीसावरगाव येथील तलावाच्या समोर असलेल्या पुलावरील रस्त्याचे काम सुरु असून एका बाजूचा रस्ता करण्यात आला आहे तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरु आहे. यामुळे दोन वाहने समोरा समोरून जावू शकत नाही. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पुलावर ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व दुसरे वाहन अडकल्याने वाहतूक ठप्प झाली होती.जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याला वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरीकांची गैरसोय झाली होती.
अनेक पुलावरील रत्याचे काम अर्धवट
लोखंडसावरगव येथील दोन पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट असून यामुळे याठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असते. अर्धवट नालील्या धडकुन दोन दिवसापुर्वीच मोरेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ तरुण ठार झाल्याची घटना घडलेली आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरीकांना प्रचंड अडची येत असतांना महामार्गाचे अधिकारी मात्र कुभंकर्ण झोपीत आहेत.