क्राईम डायरीगेवराई

भररस्त्यात पेट्रोल पंप चालकाला लुटले

पावणे चार लाखांची रक्कम लंपास

गेवराई/ प्रतिनिधी :

पेट्रोलपंपावर दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या मालकाची कार तीन चोरट्यांनी अडवली . त्यानंतर कारच्या काचा फोडून आतील पावणे चार लाखांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला . ही घटना रविवारी ( २० जून ) रात्री उशिरा गेवराईजवळ घडली.

ओमप्रकाश मदनराव बेदरे ( रा . गजानन नगर , गेवराई ) आणि अमोल दिलीप कुलथे यांचा भागीदारीत पेट्रोल पंप आहे . रविवारी दिवसभर जमा झालेली ३ लाख ७६ हजार ८५० रुपयांची रक्कम एका काळ्या बॅगमध्ये घेऊन ओमप्रकाश बेदरे रात्री ११ वाजता स्वतःच्या कारमधून (एमएच २३ एडी ४०११ ) घराकडे निघाले होते . राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपापासून अंदाजे तीनशे मीटरवर रस्ता दुभाजक ओलांडण्यासाठी ते थांबले असता अचानक शहागडच्या दिशेने एक विना अचानक शहागडच्या दिशेने एक विना क्रमांकाच्या कारमधून तीन चोरटे आले आणि त्यांनी बेदरे यांच्या कारसमोर त्यांची गाडी आडवी लावली. त्यापैकी दोघे बेदरे यांच्याजवळ आले आणि पैसे दे अन्यथा जीवे मारुत अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर एकाने टामीने कारचे काच फोडले आणि पुढील सीटखाली ठेवलेली पावणेचार लाखांची रक्कम असलेली बॅग घेतली व तिघेही कारमधून पसार झाले . याप्रकरणी ओमप्रकाश बेदरे अन्च्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्यांवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!