अंबाजोगाई

ग्रामीण भागाच्या विकासाकरीता रस्ते आवश्यक-जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
ग्रामीण भागाच्या विकासाकरीता मजबुत व पक्के रस्ते आवश्यक आहेत.शेतक-यांच्या अडचणी पाहता त्यांना शेतात जाण्यासाठी,वाहने नेण्यासाठी येणा-या नादुरूस्त रस्त्याची गरज ओळखून पुस गावाहून मुरंबी पाझर तलावाकडे जाणारा नादुरूस्त झालेल्या रस्त्याच्या दुरूस्ती कामाचा प्रारंभ जि.प.अध्यक्षा शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट म्हणाल्या की,महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचे मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ नेते बन्सीआण्णा सिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार व शिवाजी सिरसाट यांच्या दूरदृष्टीतून आणि बीड जिल्हा परीषदेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न,समस्या सोडविण्याचे आणि ग्रामीण भागातील विकास करण्याचे काम करीत आहोत.हे काम पुढील काळात ही असेच सुरू ठेवण्यासाठी जनतेच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरीता मजबुत व पक्के रस्ते आवश्यक आहेत.शेतक-यांच्या अडचणी पाहता त्यांना शेतात जाण्यासाठी, वाहने नेण्यासाठी येणा-या नादुरूस्त रस्त्याची गरज ओळखून पुसहून मुरंबी पाझर तलावाकडे जाणारा नादुरूस्त झालेल्या रस्त्याच्या दुरूस्ती कामाचा प्रारंभ जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट या बोलत होत्या.या प्रसंगी पुस गावचे सरपंच वसंत देशमुख,पांडुरंग देशमुख, युवराज पवार, हावळे, विष्णू गायके,बप्पासाहेब पवार,प्रल्हाद सुधारे,महादेव हावळे,व्यंकट देशमुख, देशमुख,धनंजय गायके,वसंतराव उदार,रखमाजी सावंत,नासेरभाई पठाण,शेख इसाकभाई आदींसह परीसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!