अंबाजोगाई

राजश्री शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोक राजे होते- ॲड. संदीप थोरात

अंबाजोगाई: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि. 6 ) राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्त, महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड. संदीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते औरंगाबाद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आनंद देशमुख संचालक, राष्ट्रीय सेवा योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रमुख वक्ते ॲड. संदीप थोरात यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्व, व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूवर सविस्तर भाष्य केले. राजश्री शाहू महाराज हे सर्व अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपणारे नेतृत्व होते. ते लोकांचे राजे होते. लोकांच्या प्रगतीसाठी, आनंदासाठी, सामाजिक सांस्कृतिक दर्जा उंचविण्यासाठी विविध कायदे, नियम, उपक्रम त्यांनी आवर्जून राबविले. लोक कल्याणकारी लोकांच्या मनातील राजा म्हणून राजश्री शाहू महाराज यांचे स्थान कायम अबाधित राहील, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. आनंद देशमुख यांनी छत्रपती शाहू महाराज हे महान राजे होते तळागाळातील वंचित, शोषित लोकांच्यासाठी शाहू महाराजांनी केलेले कार्य कायम स्मृतीत राहणारे आहे. त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आजच्या नेतृत्वाने, सत्ता करणाऱ्या नेतृत्वांनी कार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवदास शिरसाट यांनी राजश्री शाहू महाराज हे दृष्टे राजे होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामधील आदर्श राजांपैकी ते होते. आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. माणसाला दुय्यमत्व देणाऱ्या विविध प्रथा, रूढी त्यांनी बंद केल्या व माणसाचे जगणे आनंदित होण्यासाठी त्यांनी अनेक कायदे केले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी प्रजेच्या विकासासाठी मूलभूत कार्य केले. असे महत्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे यथोचित पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ.इंद्रजित भगत यांनी केले. प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल श्री. सुनील भोसले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीपाद कदम यांनी मानले. या व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!