बीड

पिंपळनेर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

पिंपळनेर / प्रतिनिधी :
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीगणेश सार्वजनिक वाचनालयात आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राजेश गवळी तर प्रमुख पाहूणे म्हणून ग्रामसेवक एस. एन. मुसळे, शिक्षक बळीराम बहिर, भागवत ठोकरे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी प्रजाहितदक्ष शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती सांगीतली. शाहू महाराज यांनी राज्य कारभार करीत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगीतले. या कार्यक्रमाला भागवत कदम, गणेश राऊत, गणेश जोगदंड, गणेश वरपे, क्रष्णा जाधव, आदीनाथ गवळी, अतुल केकाण, बंडू हौसारे, प्रदिप आनेराव, अवदुत चव्हाण, बालाजी पवार, मधूकर सातपुते, संदिप नरवडे, दत्ता गाडे, सखाराम गाडे, दिणेश हाडूळे सह आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!