महाराष्ट्र

सामाजिक समतेची प्रस्थापना करणारे शाहुमहाराज हे एक महान राजे – प्राचार्य अशोक बच्छाव

नाशिक/ प्रतिनिधी:
छञपती शाहु महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केल्या जातो या मागे त्यांच्या सामाजिक कार्याची महती आहे असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बच्छाव यांनी केले. शाहुमहाराजांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि. २६) अजमेर सौंदाणे येथिल एकलव्य शाळेमधे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

आदिवासी विकास विभागाच्या अजमेर सौंदाणे येथिल एकलव्य मॉडेल रेसिजेंन्शिअल स्कुल मधे छञपती शाहुमहाराज यांच्या जयंतीनिमित्त निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पांजली वाहिली. पुढे बोलतांना प्राचार्य बच्छाव म्हणाले की, शाहुराजेंनी राजकीय महत्वकांक्षेपेक्षा सामाजिक व धार्मिक प्रस्थापना करण्यावर अधिक भर दिला. सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी समाजातल्या सर्व स्तरांतील लोकांसाठी शिक्षणाची सोय केली.अनेक शैक्षणिक संकुलनाची उभारणी केली, त्यामधे सर्वांना मोफत प्रवेश व पाञतेनुसार नोक-यांची सोय केली. शेतक-यांप्रती राजेंना कमालीची काळजी होती म्हणुन त्यांनी आपल्या तोफा वितळवुन शेतक-यांना नांगरण्यासाठी फाळांचा पुरवठा केला यावरुन शाहुरांजाची महानता सिद्ध होते असे ते म्हणाले. या अभिवादन कार्यक्रमाला निलेश कुलकर्णी, पी. बी. गोसावी, एस. आय. जगताप, नारायण चौधरी, ए. जे. मंगळे, पी. आर. आहेर, गणेश गायसमुद्रे, ए. वाय. पठाण, सुरेश पवार, शिवाजी देवरे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!