केजक्राईम डायरी
केज येथे समाजसेवीकेचा विनयभंग

केज/प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील एका समाजसेवीकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना सोमवारी ( दि. ७) घडली. याप्रकरीणी दोघावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तू आम्हास आवडतेस, तू आमच्या सोबत लग्न कर असे म्हणून दोघांनी वेगवेगळया फोनवरून तिला त्रास दिला. ती भेटली असती तू आमच्या सोबत फिरायला चल अन्यथा जीवे मारुन टाकू असे म्हणून वाईट हेतूने तीचा हात धरुन विनयभंग केला . त्यानंतर पिडीतेन केज पोलिस ठाणे गाठून दोघा नराधामावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पोलस निरीक्ष्क प्रदीप त्रिभुवन पुढील तपास करीत आहेत