केज

जि.प.उच्च प्राथमिक शाळा सादोळा येथे पालक सभा संपन्न

युसूफवडगांव/प्रतिनिधी:-  केज तालुक्यातील सादोळा येथील जि.प.शाळेमध्ये दि.१२ मार्च रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सभेची सुरुवात हि शाळेने सन२०२१-२२ मध्ये राबविलेले उपक्रम व सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा २०२२ अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.सदरील पालकसभेत यावेळी शाळेस नगदी स्वरूपात पंधरा हजार रुपये देणगी म्हणुन प्राप्त झाली.सरपंच,उपसरपंच,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,सदस्य यांनी देणगी देऊन पुढील काळात असेच शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जोगदंड सर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संदीपजी दाणे,उपसरपंच अंगदराव इंगळे,शा.व्य.समितीचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे,उपाध्यक्ष सुनीलराव शिंदे यांच्यासह विलास वैरागे,शरद इंगळे,भैरवनाथ इंगळे, ग्रामसेविका गुंडरे मॅडम, अंगणवाडी ताई श्रीमती शिंदे मॅडम, बापू वैरागे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पालक, महिला, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री लाखे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दळवी सर यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री मुळे सर , श्री पवार सर यांनी सहकार्य केले .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!