नायब तहसीलदार गणेश सरोदे यांची कार पलटी झाली नसून ट्रकने दिली होती धडक

अंबाजोगाई: येथील तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांची कार दि. २६ जानेवारी रोजी पलटी होऊन अपघात झाल्याची घटना अंबाजोगाई लातूर रोडवर असलेल्या पोखरी फाट्याजवळ घडली होती. परंतु त्यांची कार पलटी न होता त्या कारला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सरोदे यांनी पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार गणेश सरोदे हे दि. २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयातील ध्वजारोहण करून बर्दापूर येथे शासकीय कामानिमित्त आपल्या स्कोडा कार ने जात होते. यावेळी पोखरी येथे त्यांची कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली होती. या अपघातात सरोदे यांच्या छातीला व पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला होता, तसेच कारचे नुकसान झाले होते. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर गणेश सरोदे यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी मालवाहू ट्रक ( के. ए. ५६. ४१२५) च्या चालका विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कारला पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली होती. धडक देऊन ट्रकचालक फरार झाला होता. कार पलटी झाली नसून मालवाहू ट्रकने धडक दिल्याने ती रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याचे समोर आले आहे.
नायब तहसीलदार गणेश सरोदे