बीड
सोमवारपासून जिल्ह्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी

बीड/प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात बंद असलेले पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास येत्या सोमवारपासून जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी परवानगी दिली आहे यापूर्वी जिल्ह्यात आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होते.
बीड जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यात पहिली ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू होते. जिल्ह्यात बाजार व इतर व्यवसाय सुरू होते तर केवळ पहिली ते सातवीचे वर्ग बंद होते. यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी येत्या सोमवारपासून बीड जिल्ह्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.