न्यु व्हिजन पब्लिक स्कूल येथे शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा संपन्न

अंबाजोगाई: शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कुल येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२२रोजी शिक्षकांसाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांमध्ये शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून शाळेचे प्राचार्य प्रवीण शेळके हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा रामधामी यांनी मांडले तर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य प्रवीण शेळके यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक साहित्याचे महत्त्व समजावून सांगताना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील कठीण भाग अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी उपयोग होतो तसेच यशस्वी अध्यापन होण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो असे नमूद केले.अवघड भाग अत्यंत सोपा करून सांगण्यासाठी शैक्षणिक साहित्य वापरल्यानंतर विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे अध्यापन करता येते . पुढे बोलताना ते असं म्हणाले की शैक्षणिक साहित्या शिवाय आपले प्रभावी अध्यापन होऊ शकत नाही. शैक्षणीक साहित्य निर्मितीसाठी प्राचार्य शेळके यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमासाठी गायकवाड मॅडम, शारदा मॅडम या आवर्जून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका शिल्पा पोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा दायमा यांनी केले केले.तर या कार्यक्रमासाठी उषा रामधामी आणि ओमप्रकाश काळवणे या शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले .