बीड

पत्रकार पृथ्वीराज निर्मळ यांची कार्याध्यक्षपदी निवड

बीड / प्रतिनिधी:
माजलगाव येथील पत्रकार पृथ्वीराज निर्मळ यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय निवड व बैठक बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे दि.३० जानेवारी २०२२ रोजी दुपारी संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते पत्रकार पृथ्वीराज निर्मळ यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक दशरथ रोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संघाची बैठक संपन्न झाली. पत्रकार निर्मळ यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!