जय हिंद ग्रुपच्या समन्वयक पदी सुभाष शिंदे

अंबाजोगाई: येथील जय हिंद ग्रुपच्या समन्वयक पदी योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या मंदिर विभागाचे प्रमुख सुभाष शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
आम्ही भारतीय ! माणुसकी हीच जात व माणुसकी हाच धर्म याची शिकवण युवकांना देण्याचा व समाजात हा विचार रुजविण्याचा जयहिंद ग्रुपचा प्रमुख उद्देश असेल असे समन्वयक सुभाष शिंदे म्हणाले. वैचारिक प्रदूषण वाढीबरोबरच जातिवाद व प्रांतवादाचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होत आहे. ज्या महापुरूषांनी देशासाठी काम केले त्यांनाच जाती-पाती मध्ये अडकवून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जात-पात धर्म ही आपल्या घरात राहून आदर करण्याची बाब आहे. जातीविरहित समाज महामानवांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाती साठी नाही तर राष्ट्रासाठी काम केले. त्यांचे विचार युवकांमध्ये, समाजामध्य रुजविण्यात आले.असे मत प्रा.मेजर एस.पी.कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ग्रुपच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून प्राध्यापक मेजर एस.पी. कुलकर्णी,रवी मठपती , सहशिक्षक भागवत मसने, संतोष चौधरी ,बी.के. मसने, प्राध्यापक राजकुमार थोरात ,बी.के. बाबरदोडे, विवेकानंद कुलकर्णी, हेमंत धानोरकर, गणेश कदम ,प्रा.डोंगरदिवे. प्रा.शिंपले,प्रा. प्रवीण भोसले, प्रा .किरण चक्रे. प्रा. सविता बुरांडे, अशोक आखाडे, ए.सी. भांडारी, ऍड. सुभाष शिंदे ,बाळू केकान, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे प्रा.श्रीराम शेप यांची निवड करण्यात आली आहे.