संभाजी ब्रिगेड करणार जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी-जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

अंबाजोगाई/प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड पूर्व भागातील परळी, केज,अंबाजोगाई या तालुक्यातील जिल्हा,तालुका व शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या नविन निवडी लवकरच करण्यात येणार आहेत.याबाबतचा अहवाल नुकताच वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच याबाबत तीनही तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत अशी माहिती संभाजी ब्रिगेड बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेडने बीड जिल्ह्यात पक्ष विस्तार करण्यासाठी नव्याने विविध सामाजिक आघाड्यांची घोषणा केलेली आहे.संभाजी ब्रिगेड पक्ष हा बीड जिल्ह्यात सर्वत्र नांवारूपास येत आहे.मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडने विविध सामाजिक प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार आणि कोशाध्यक्ष संतोष गाजरे,संघटक
प्रा.सुदर्शन तारख,संघटक डॉ.बालाजी जाधव,संघटक अतुल गायकवाड,विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलने केलेली आहेत.शेतकरी,कष्टकरी,सर्वसामान्य जनतेचे प्रश्न,विद्यार्थी शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळावा यासाठी न्याय हक्कांसाठी लढा उभा केला आहे.विविध प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली आहे.आवाज उठवला आहे.विविध आघाड्यांवर काम करण्यासाठी तसेच सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील तरूण वर्ग हा संभाजी ब्रिगेड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका लढविणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी लवकरच अंबाजोगाई,परळी,केज या तालुक्यातील विविध आघाड्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच केलेल्या आहेत.आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा,तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या नविन निवडी या ऑनलाईन तसेच अंबाजोगाई येथे लवकरच कोविड १९ चे नियम पाळून बैठक आयोजित करून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.यामुळे मागील अनेक वर्षांपासून कार्य करणा-या निष्ठावंतांना न्याय मिळवून देणार असल्याची सकारात्मक भूमिका जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांनी घेतलेली दिसून येत आहे.तसेच विद्यमान तालुका पदाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यकारिणीत काम करण्याची संधी देण्यात येईल.तर सामाजिक बांधिलकी जोपासत राजकीय व सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक युवक,युवती आणि तरूणांना तालुका आणि शहर कार्यकारणीत विविध पदांवर काम करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येईल.तरी इच्छुक युवक,युवती आणि तरूणांनी संपर्क साधावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा पुर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे.