केज

पोलिस नाईक शिवाजी शिनगारे सेवानिवृत्त

गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी शिनगारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना केज पोलिस ठाण्याच्या वतीने अधिकारी, कर्मचारी व सहकारी यांच्या वतीने निरोप देण्यात आला.

केज पोलिस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी शिंगारे हे विहित वयोमर्यादे नुसार दि. २८ फेब्रुवारी मंगळवार रोजी सेवा निवृत्त झाले. त्या निमित्त केज पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाचे अध्यक्ष प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, सहाय्यक फौजदार कादरी, सहाय्यक फौजदार अनिसोद्दीन शेख, सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक तानाजी शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व पोलीस कर्मचारी पत्रकार महादेव गायकवाड, गौतम बचुटे आणि सामाजिक कार्यकर्ते रिपाइंचे दिलीप बनसोडे, बप्पा कुलकर्णी, दादा सिरसट उपस्थित होते.
या वेळी बोलताना सपोनि शंकर वाघमोडे म्हणाले की, कामाच्या बाबतीत शिवाजी शिनगारे हे सदैव तत्पर असत. कोणात्याही कामात आळस न करता मदत करणे हा त्यांचा गुण होता. तसेच त्यांचा सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा आणि हजरजबाबीपणा हे विशेष गुण होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सपोनि संतोष मिसळे यांनी तर सूत्रसंचलन अशोक गवळी यांनी केले. यावेळी अनेक उपस्थितांनी शिवाजी शिनगारे यांचे सोबतचे अनुभव कथन केले. या निरोप समारंभाला शिवाजी शिनगारे यांच्या पत्नी, भाऊ, मुले व त्यांचा सर्व परिवार आणि नातलग देखील उपस्थित होता.

सत्काराला उत्तर देताना शिवाजी शिनगारे  म्हणाले की,  केज येथे असतानाच पोलीस दलात भरती झालाे व सेवा निवृत्ती देखील केजमध्येच. प्रशिक्षण काळात केज पोलीस ठाण्यातचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केले. आज त्यांचेच पुत्र सपोनि शंकर वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ होत आहे. तर ज्या दिवशी निरोप दिला जात आहे त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस देखील आहे. हा योगायोग आणि त्रिवेणी संगम असून केज पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी खूप चांगले आणि एकमेकांना मदत करणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी सर्वांचे ऋण व्यक्त केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!