अंबाजोगाई
ममदापूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

शिवाजी जाचक/ ममदापूर: विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे ममदापूर पाटोदा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये बाल रोग तज्ञ डॉ. संदीप मोरे, डॉ.चेतन आदमाने, स्त्री रोग तज्ञ डॉ. उमाकांत कुलकर्णी ,अस्थिरोगतज्ञ डॉ. नयन देशमुख, दंतरोग तज्ञ डॉ. अमित लोमटे, जनरल फिजिशियन डॉ. रवीकुमार फड, जनरल सर्जन , डॉ.नितीन साखरे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सावीका क्लीनिकल लॅब पाटोदा यांच्यातर्फे मोफत रक्त तपासणी केली जाणार आहे. या शिबिराचा लाभ असे आवहान जयंती उत्सव समिती अध्यक्ष अतिश सरवदे यांनी केले आहे.