अंबाजोगाई

साकुड येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

अंबाजोगाई :  तालुक्यातील साकुड येथे  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.  रक्तदान शिबीराचे हे सलग 17 वे वर्ष आहे. यावेळी 18 जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  पांडुरंग जोगदंड तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अतुल देशपांडे व डॉ. देवराव चामणर यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांनी रक्तदानाचे महत्त्व जीवनात किती आहे हे सांगितले. या रक्तदान शिबीरात एकूण 18 जणांनी रक्तदान करून आपला राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीरात 2 महिलांनी पण रक्तदान करून सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबीरात दशरथ चाटे, राजकुमार सुर्यवंशी, मुंजा चाटे, बालाजी चाटे, सिताराम पांचाळ, अनिल चाटे, विष्णू भोसले, राम चाटे, संभाजी चाटे,  प्रवीण वेडे,  महेश चाटे,  राहुल चाटे, ऋषिकेश चाटे,  प्रताप चाटे, अविनाश चाटे, विशाल चाटे, कुशावर्ती चाटे, सुमेधा चाटे यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. दीपक फुटाणे, तुकाराम चाटे, भास्कर चाटे, ईश्वर चाटे, भागवत चाटे, विठ्ठल चाटे, दत्ता चाटे, गोविंद चाटे, प्रभु चाटे, गोवर्धन चाटे, पांडुरंग चाटे, शिवाजी चाटे, महादेव चाटेसह आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!