केज

शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून केली बेघर शिवसैनिकाला घर बांधकामासाठी आर्थिक मदत

गौतम बचुटे/केज:  केज तालुका शिवसेना प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून आणि त्यातून वाचलेले पैसे त्यांचा एक बेघर असलेला सहकारी शिवसैनिक याला घर बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला.

या बाबतची माहिती अशी की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक असलेले केज तालुक्यातील साळेगाव येथील केज तालुका शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख ज्योतिकांत कलसकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आणि हलाखीची आहे. ज्या घरात प्राणी सुद्दा राहू शकत नाहीत. अशा कच्च्या पडझड झालेल्या मातीच्या घरात केज तालुक्यातील शिवसेनेचा कार्यकर्ता आपल्या कच्च्या बच्चासह राहत आहे. आपल्याला एखाद्या योजनेतून किमान घर तरी मिळेल. अशी या तालुकास्तरावर काम करणाऱ्या बेघर कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. ज्योतिकांत नागनाथ कलसकर हे केज तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांचे मूळ गाव हे केज तालुक्यातील साळेगाव आहे. ते गेली पंधरा ते सोळा वर्षां पासून त्यांनी साळेगावचे शाखा प्रमुख ते केज तालुका संघटक, प्रसिद्दी प्रमुख म्हणून काम केलेले आहे. आता त्यांच्याकडे केज तालुका शिवसेनेच्या प्रसिद्दी प्रमुखाची जवाबदारी आहे. ते अल्प संख्यांक ओबीसी पैकी शिंपी समाजाचे आहेत. घरात अठरा विश्व दारिद्र्य, कुटुंबात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कुटुंबात खाणारी तोंडे जास्त आणि मजुरी शिवाय अन्य काही साधन नाही. त्यातच सभा, मेळावे, मोर्चा, रस्ता रोको किंवा नेत्यांचे सत्कार दौरे असले की हातातले काम टाकून पक्षाच्या कामाला जावे लागत असल्याने उपसमारही ठरल्यालीच. त्याची दखल तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी घेत स्वतःचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्याची अंमलबजावणी स्वतः केली. त्यांनी वाढदिवसा निमित्त कोणतेही बॅनर्स, फ्लेक्स न लावता त्यातून वाचविले पैसे हे आपल्या बेघर असलेल्या शिवसैनिकाला निवारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते २१ हजार रु. चा धनादेश ज्योतिकांत कलसकर यांना सुपूर्त केला. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

ज्योतिकांत कळसकर यांच्या घराचे बांधकाम ज्या वेळी सुरू करण्यात येईल त्या वेळी मी साळेगाव येथे येईन. – अप्पासाहेब जाधव ( जिल्हा प्रमुख, बीड)

 

मी आमचे कार्यकर्ते व प्रसिद्धी प्रमुख ज्योतिकांत कलसकर यांना घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी मी माझा वाढदिवस साजरा न करता त्यांना मदत केली आहे.

– रत्नाकर शिंदे( तालुका प्रमुख, केज)

 

माझे पती शिवसेनेचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करीत आले आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबाला घर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.- सौ. सुरेखा कलसकर 

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!