शिवजयंती निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

केज :- केज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
या बाबतची माहिती अशी की, १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्त सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी शहरातील कार्यकर्यांची बैठक घेतली. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रा. हनुमंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संदीप नाईकवाडे, संतोष खोडसे, संजय लोंढे, मयूर कदम, निशांत डोरनाळे, राहुल बियाणी, ज्ञानेश्वर गुंड, भागेश अन्नदाते, सूरज नाईकवाडे, बालासाहेब भोसले, संतोष लोंढे, महेश सत्वधर, सुमित तेलंग, अजय साळुंके, संघर्ष भोसले, रोहित कसबे, सुदेश सिरसट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.