मातापित्यांचे छत्र हरवलेल्या अश्विनीला शिवसैनिकांनी दिला आधार !

केज/रणजित घाडगे:
आई-वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे तालुक्यातील नांदुर घाट येथील अश्विन ठोंबरे ही मुलगी पोरकी झाली होती. तिला आधार देण्याचे काम शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनीला आधार देत तिचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
मागच्या मे महिन्यामध्ये अवकाळी पावसात नांदुर घाट शिवारामध्ये शेतात काम करत असताना गिताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता, तसेच त्यांचे पती जगन्नाथ ठोंबरे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. यामुळे त्यांची मुलगी अश्विनी पुढे आपले शिक्षण व घर कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला होता. अश्विनी ची अवस्था पाहून तिला आधार देण्याचे काम शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. बारा हजार रूपये किमतीच्या जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू अश्विनी ला देण्यात आल्या. तसेच शिक्षणाचा जेवढा खर्च होईल तेवढा उचलण्याचा शब्द थोरात यांनी दिला. यावेळी अरविंद थोरात व सैनिक गणेश लामतुरे यांनी येऊन अश्विनीला दहावीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अमोल जाधव, गोविंद तानगे व स्थानिक पीटीघाट येथील रहिवासी यांच्या हस्ते अश्विनीला साहित्य दिले व यापुढेही शिक्षणासाठी जो खर्च लागेल तो देण्याचा शब्द दिला.