केज

नगरपंचायत निवडणूक शिवसेना आता स्वबळावर लढवणार

माजी खासदार खैरे यांची घोषणा

केज/प्रतिनिधी:

केज आणि वडवणी नगरपंचायतीची आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करतानाच शिवसैनिकांनी आतापासून मोर्चेबांधणी करून नगरपंचायत ताब्यात घेण्याच्या तयारीला लागावे, अशा सूचना शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केज येथे झालेल्या बैठकीत दिल्या.
केज शहरातील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात माजी खासदार खैरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (ता.१६ जून) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक हे होते. महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे, उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे, जिल्हा संघटक योगेश नवले, गौतम वैराळे, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुढे माजी खासदार खैरे म्हणाले की, केज नगरपंचायतीची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी प्रभागनिहाय मोर्चेबांधणी करत घरोघरी शिवसेनेचे विचार पोहोचवावेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची शिदोरी घेऊन पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची बांधणी करावी, असे आवाहन केले. केज शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीला नगरविकास मंत्रालयाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही चंद्रकांत खैरे यांनी दिली. या बैठकीला अनिल बडे, वडवणी तालुका प्रमुख संदीप माने, नागेश डिगे, विनायक मुळे, माउली गोंडे, प्रमिला माळी, महाराणा घोळवे, मनोरमा डोईफोडे, बालू पवार, अशोक जाधव, विकास काशिद, अभिजित घाटुळ, जाहेद शेख, पप्पू ढगे, शशिकांत इंगळे, तात्या रोडे, बंडू जाधव, दत्ता अलगट, विष्णू टकले, हनुमान शिंदे, मारुती मुंडे, शंकरसिंग गोखे, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर बोबडे, विशाल नाईकवाडे, शहादेव भोसले, डॉ. बुडूक, अंगद देशमुख, मधुकर अंधारे, अनिकेत शिंदे, अविनाश करपे, दीपक जाधव, रामभाऊ पवार, शिवाजी बिक्कड, रवी फुके, प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!