अंबाजोगाई

डॉ. क्रांती सिरसाट राज्यात प्रथम

अंबाजोगाई: येथील कृषी महाविद्यालया समोरील वसाहतीत राहणाऱ्या डॉ. क्रांती महादेवराव सिरसाट या पिजी परीक्षेत मागासवर्गीय प्रवर्गातून देशात अकराव्या तर महाराष्ट्रातून पहिल्या आल्या आहेत. केंद्र शासनाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.  मेडिसन मध्ये पीजी करण्यासाठी यांची निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (पीजी) ला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश पूर्व नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला त्यामध्ये डॉ. क्रांती यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला तर देशात अकरावा क्रमांक मिळाला आहे. त्यांनी पीजी साठी “मेडिसिन” हा विषय निवडला आहे. डॉ. क्रांती यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!