अंबाजोगाईक्राईम डायरी

भावठाणा येथून विहिरीवरील सोलर पॅनल व मोटार पळवली

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
विहीरीवर बसलेले सोलर पॅनल, मोटार व वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील भावठाणा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भावठाणा येथील शेतकरी सुशांत गोविंद होके यांची गट नंबर 79 मध्ये असलेल्या शेतातील विहिरीवरील सोलार पॅनल त्यावर चालणारे 3 एच. पी. ची. मोटार व मोटारवर बांधलेले 150 फूट वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले, ही घटना 12 मे रोजी घडली. चोरी गेलेल्या साहित्याचा शोध घेतला असता मिळून न आल्याने शेतकरी सुशांत गोविंद होके यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!