अंबाजोगाईक्राईम डायरी

वरपगाव येथून सोयाबीनचे दहा कट्टे चोरी

अंबाजोगाई: शेतात ठेवलेले सोयाबीनचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील वरपगाव येथे रविवारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वरपगाव येथील शेतकरी रावण बाबुराव रिटरकर हे आपल्या कुटुंबासह स्वतःच्या शेतात राहतात. नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन रिटरकर यांनी शेतात ठेवलेले दहा सोयाबीनचे कट्टे चोरट्याने चोरून नेले. यामुळे त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रावण रिटरकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस जमादार चौरे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!